लव्ह मॅरेज, चारित्र्यावर संशय, आधी भांडण मग गळाच घोटला
Breaking News | Titwala Crime: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली.
टीटवाळा: ठाण्याच्या टिटवाळामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. माही मोपे (वय 24) असे या मृत महिलेचे नाव आहे. बायकोने चारित्र्यावर संशय घेतल्याने नवऱ्याने संतापून तिची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने टिटवाळा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेश मोपे आणि त्याची बायको माही मोपे टिटवाळा परिसरात राहात होती. महेश पडघा येथील डी मार्टच्या गोदामात काम करायचा. महेश आणि माही या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे 3 वर्षापुर्वीच दोघांनी लव्ह मॅरीज केले होते. दोघांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं असताना अचानक माहीला महेश मोपेच्या चारित्र्यावर संशय आला होता.
खरं तर महेशचे अनैंतिक संबंध सुरु असल्याची माहिती माहीला मिळाली होती. त्यामुळे माहीने या अनैंतिक संबंधाबाबत महेशला विचारले असता दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर अनेकदा याच विषयावरून दोघांमध्ये वादावादी झाली होती. आज सकाळी सुद्धा दोघांमध्ये याच विषयावर भांडणे झाली होती. या भांडणाचा वाद इतका टोकाला गेला की, महेशने माहीचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी टिटवाळा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या हत्येनंतर पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता, महेशने हत्येची कबुली दिली होती. पण या प्रकरणात माहीच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
महेश आणि माहीने लव्ह मॅरेज केल्याने त्याच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते. त्यामुळे नेहमी त्यांची घरी भांडणे व्हायची, वादावादी व्हायची. यामुळे सासरच्या मंडळीनेच माहीची हत्या केल्याचा आरोप माहीच्या आई-वडिलांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी माहीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे.
Web Title: Love marriage, character doubt, first fight then strangulation
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study