Home Maharashtra News प्रेमाचा अंत: प्रेमीयुगुलाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

प्रेमाचा अंत: प्रेमीयुगुलाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

Lovers commits suicide under running train

नागपूर: एकमेकांवरील अफाट प्रेम आणि घरच्यांच्या विरोधातून अल्पवयीन प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलत धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणी या प्रेमीयुगलाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

आदित्य कुरील वय 18 वर्षे तर मृतक मुलगी ही 16 वर्षाची अल्पवयीन आहे.

कन्हान रेल्वे पुलियाजवळील 100 मीटर दूर अंतरावरील कामठी रेल्वे ट्रॅकवर दोन्ही प्रेमी जोडप्यानी हातात हात घालून हावडा अहमदाबाद धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हे दोघेही शहरातील जयभीम चौक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने आणि विरोध असल्यानं या टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी हे दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या घरच्यांनी कामठी पोलीस स्टेशन ला नोंदविली असता पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंदवित तपासाला गती दिली.

Web Title: Lovers commits suicide under running train

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here