Home Maharashtra News LPG Price Hike Today : घरगुती गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ

LPG Price Hike Today : घरगुती गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ

LPG Price Hike Today

LPG Price Hike Today: निवडणुकीच्या कालावधीत पेट्रोल व  घरगुती एलपीजी सिलिंडर दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. मात्र, आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल व घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आज मंगळवारपासून १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे. काही महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढण्यात आले आहेत. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आलेले होते

शहरानुसार घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत:

दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९४९.५ रुपये झालीय. पूर्वी ते ८९९.५० रुपये होते. तर मुंबईत आता ८९९.५ रुपयांच्या जागी ९४९.५ रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईत हा दर ९६५.५ रुपयांवर आहे. याआधी पेट्रोल आणि डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे.

Web Title: LPG Price Hike Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here