Home संगमनेर आम्ही माफी मागीतली, तुमची ती सुद्धा दानत नाही: राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर...

आम्ही माफी मागीतली, तुमची ती सुद्धा दानत नाही: राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | Balasaheb Thorat vs Radhakrishana Vikhe Patil.

Maharashtra Assembly Election 2024 Radhakrishna Vikhe Patal's attack on Thorat

संगमनेर:  भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख  यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले.

विखे पाटील म्हणाले, दहशतवादाचे बीज तुम्ही रोवलंय. संगमनेरच्या घटनेबाबत आम्ही माफी मागीतली, तुमची ती सुद्धा दानत नाही. तुमचा भाऊ आणि तुमचा स्विय सहायक लाठ्या काठ्या घेऊन होते, मग दहशत वाद कुणाचा? असा सवाल देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत थोरातांवर हल्लाबोल केला आहे. तसेच जनता त्यांच्या पाठीशी नाहिये, वैफल्यातून त्यांच्याकडून हे सगळे प्रकार सुरू आहे. त्या दिवशी सुजयला मारण्याचा कट होता मी त्याचा जाहीर निषेध करतो, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर आमदार तर व्हा, असा टोला देखील त्यांनी थोरातांना लगावला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल १२ तास ठिय्या मांडला होता. वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयश्री थोरात यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी राहत्यामध्ये मेळावा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Radhakrishna Vikhe Patal’s attack on Thorat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here