Home पुणे अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीचे उमेदवार आमनेसामने

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीचे उमेदवार आमनेसामने

Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली.

Maharashtra Assembly Election Fourth list of Ajit Pawar group announced

Vidhan Sabha Election 2024 | Ajit Pawar NCP 4th List : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपाचा तिढा सोडवला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मोर्शीमधून देवेंद्र भुयार तर भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मोर्शीमधून देवेंद्र भुयार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. आता भुयार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, चौथ्या यादीत देखील नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज भरणार की, पक्षाकडून आगामी विधानसभेसाठी अर्ज दाखल करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, आणखी एक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे, मोर्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अद्याप महायुतीकडून जागा वाटप पूर्णपणे झालेले नसल्याने उमेदवारांनी अर्ज भरले आहे.    

Web Title: Maharashtra Assembly Election Fourth list of Ajit Pawar group announced

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here