Home Maharashtra News जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोनाची अपडेटेड आकडेवारी

जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोनाची अपडेटेड आकडेवारी

Maharashtra Corona Today

Maharashtra Corona Today : मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये काहीशी तफावत होत असल्याचे दिसत आहे. पण दुसरीकडे संपूर्ण राज्यातील आकडेवारीने चिंता वाढवली आहे. राज्यात आजही 40 हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे कालच्या तुलनेत आज राज्यात 40 हजार 368 रुग्णांना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.3% इतका झाला आहे.

आजपर्यंत राज्यभरात तपासण्यात आलेल्या 7,19,74,335 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 72,11,810 नमुने संक्रमित आढळले आहेत. सध्या राज्यात 21,98,414 व्यक्ती घरी उपचार घर आहेत तर 2921 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये उपचारार्थ दाखल आहेत.

दिवसभरात राज्यात 8 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण समोर आले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. यासह राज्यात एकूण 1738 ओमायक्रॉन विषाणू संक्रमित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातीलच 932 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

Web Title : Find out the updated statistics of Corona in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here