Home Maharashtra News Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाबाधित संख्येचा विळखा कायम

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाबाधित संख्येचा विळखा कायम

Maharashtra Corona Update 43211

मुंबई | Maharashtra Corona Update: राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत..राज्यात अधिक रुग्णांची वाढ होत असल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.

 राज्यात आज  238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.  आतापर्यंत 1605 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. यामध्ये 859 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे.  सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

आज मुंबईत 11 हजार 317 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Maharashtra Corona Update 43211

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here