Home Maharashtra News उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध, जाणून घ्या नवीन नियमावली

उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध, जाणून घ्या नवीन नियमावली

Maharashtra Lockdown Strict restrictions in the state from midnight tomorrow

मुंबई |Mini Lockdown : देशातच नव्हे तर राज्यात देखील कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार कोरोनाला पायबंद घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात उद्या मध्यरात्रीपासून रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार असून, या कालावधी दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसेल. तसेच पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी असणार आहे.

दिनांक ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हि नवी नियमावली लागू होणार आहे सर्व कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला विविध ठिकाणी दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल.

ठळक नियमावली पुढीलप्रमाणे:

उद्या मध्यरात्रीपासून पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.

पहाटे पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत संचारबंदी

सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश नाही.

लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत.

आंतरराष्ट्रीय विमानप्रवास केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार

मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत, केवळ कर्मचाऱ्यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक.

अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी

सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक

करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी

विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार

अंत्यविधीला २० जणांना उपस्थित राहता येणार

राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० जणांच्या उपस्थितीची अट

शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

स्विमींग पूल्स, स्पा, जिम, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून्स पूर्णपणे बंद राहणार

केशकर्तनालय (सलून्स) ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. सलून्स सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेतच सुरु ठेवता येणार

नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची करोना चाचणी करणे बंधनकारक असेल.

लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार

नाट्यगृह आणि सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. करोन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ या काळात बंद ठेवावी लागणार.

हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालवता येणार.

महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक

एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल.

Web Title: Maharashtra Lockdown Strict restrictions in the state from midnight tomorrow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here