Home Ahmednagar Live News राज्यात अवकाळीसह गारपिटीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात अवकाळीसह गारपिटीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Update:  राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला.

Maharashtra Rain Update Ahmednagar Orange Alert

अहमदनगर: राज्यातील शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी महत्वाची बातमी समोर आली आहे. ऐन रब्बी हंगामाची पिके काढणीस आली असताना, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासह तुफान गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.

पुन्हा आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान, गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Rain Update Ahmednagar Orange Alert

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here