राज्यात सरकारकडून अनलॉक नियमावली जाहीर, सोमवारपासून अंमलबजावणी वाचा आपला जिल्हा लॉक की अनलॉक
Maharashtra Unlock News: राज्यात निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्यशासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली आहे. त्या नियमांची अंमलबजावणी सोमवारी ७ जून पासून लागू करण्यात येणार आहे. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याबाबत आदेश काढला आहे.
३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पोझिटीव्हीटी दर यानुसार प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. या दोन निकषांच्या आधारावर राज्यशासनाने नियमावली जाहीर केली आहे. एकूण पाच स्तर करण्यात आले आहे. या दोन निकषांवर नियमावली निर्बंध कडक वा शिथिल केले जाणार आहे.
पहिला स्तर: ज्या जिल्ह्यात ५ टक्क्यापेक्षा कमी कोरोना पोझिटीव्हीटी दर आहे अमी २५ टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. या स्तरात माल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल.
दुसरा स्तर: ज्या जिल्ह्यात पाच टक्क्यांपेक्षा कमी पोझिटीव्हीटी दर आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले असतील ते दुसऱ्या स्तरात मोडतील. दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा गृह हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील.
तिसरा स्तर: जिल्ह्यात ५ ते १० टक्के पोझिटीव्हीटी दर आणि ४० टक्क्यापेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा तिसरा स्तर असेल. तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील. दुकाने ४ पर्यंत सुरु राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, बंद राहतील.
चौथा स्तर: १० ते २० टक्के पोझिटीव्हीटी दर आणि ६० टक्क्यापेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा असेल चौथा स्तर. येथे सायंकाळी ५ वाजेनंतर सर्व व्यवहार बंद होतील. शनिवार, रविवार व्यवहार बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने ४ पर्यंत सुरु राहतील. अन्य दुकाने बंद राहतील.
पाचवा स्तर: २० टक्क्यापेक्षा अधिक पोझिटीव्हीटी दर आणि ७५ टक्क्यापेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील तो पाचवा स्तर असेल. शनिवार, रविवार व्यवहार बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने ४ पर्यंत सुरु राहतील. अन्य दुकाने बंद राहतील.
३ जून रोजी संपलेल्या आठवड्याचा सरासरी पोझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडचे प्रमाण:
जिल्हा | ऑक्सिजन बेडचे प्रमाण | पोझिटीव्हीटी दर |
नगर | २४.४८ | ४.३० |
अकोला | ४३.० | ७.४७ |
अमरावती | २८.५९ | ६.५६ |
औरंगाबाद | २०.३४ | ५.३८ |
बीड | ४७.१४ | ८.४० |
भंडारा | ४.४१ | ७.६७ |
बुलढाणा | ७.७१ | १०.३ |
चंद्रपूर | ९.३० | ३.०९ |
धुळे | ४.२५ | २.५४ |
गडचिरोली | ५.९२ | ६.५१ |
गोंदिया | ६.३२ | २.३७ |
हिंगोली | २९.३४ | ४.३७ |
जळगाव | १५.१७ | १.६७ |
जालना | १७.६५ | २.०५ |
कोल्हापूर | ७१.५० | १५.२५ |
लातूर | १५.१३ | ४.२४ |
मुंबई उपनगर | १२.५१ | ५.२५ |
नागपूर | ८.१३ | ३.८६ |
नांदेड | ४.२८ | १.९३ |
नंदुरबार | २९.४३ | ३.३१ |
नाशिक | १८.७१ | ७.७५ |
उस्मानाबाद | ३१.०९ | ७.७० |
पालघर | ४८.९३ | ५.११ |
परभणी | १६.०२ | ७.१० |
पुणे | २०.४५ | १३.६२ |
रायगड | ३८.३० | १९.३२ |
रत्नागिरी | ५१.८१ | १६.४५ |
सांगली | ४७.९४ | १४.०१ |
सातारा | ६१.५५ | १५.६२ |
सिंधूदुर्ग | ६६.५६ | १२.७२ |
सोलापूर | ४४.३९ | ६.७८ |
ठाणे | १९.२५ | ७.५४ |
वर्धा | ४.०४ | ७.५७ |
वाशीम | १८.९० | ५.१९ |
यवतमाळ | १३.५८ | ४.१९ |
Web Title: Maharashtra Unlock News