Home Maharashtra News नाशिक पदवीधर निवडणुक:  महाविकास आघाडीचा ‘या’ उमेदवाराला पाठींबा

नाशिक पदवीधर निवडणुक:  महाविकास आघाडीचा ‘या’ उमेदवाराला पाठींबा

Nashik graduate constituency election | Shubhangi Patil: नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटील यांना तर नागपूर शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुधाकर आडबाले  यांना पाठिंबा जाहिर, सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

Mahavikas Aghadi supports Shubhangi Patil candidate

मुंबई:  महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषद घेतली. यात नाशिक पदवीधर निवडणुकीत शुभांगी पाटील यांना तर नागपूर शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी सुधाकर आडबाले  यांना पाठिंबा जाहिर केल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीत मदभेद असल्याचे पाहायला मिळाले होते. आता सुधाकर आडबाले यांना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर मविआने शिक्कामोर्तब केले आहे.

तसेच अमरावतीतून धीरज लिंगाडे, तर कोकणातून बाळाराम पाटील आणि औरंगाबदमध्ये विक्रम काळे यांना महाविकास आघाडीने पाठींबा जाहीर केल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाकडून विधान परिषद सभापती अंबादास दानवे उपस्थित होते.

Web Title: Mahavikas Aghadi supports Shubhangi Patil candidate

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here