Home महाराष्ट्र मोठी बातमी: महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार

मोठी बातमी: महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार

Election Result | New CM: अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली.

Mahayuti meeting suddenly cancelled, Eknath Shinde will go to Moolgaon

Eknath Shinde | मुंबई: सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या फोटोसेशनवेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली होती.

Web Title: Mahayuti meeting suddenly cancelled, Eknath Shinde will go to Moolgaon

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here