Home Breaking News संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुती बहुमताने विजयी होणार- आ. अमोल खताळ

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुती बहुमताने विजयी होणार- आ. अमोल खताळ

Breaking News  | Sangamner Election: विजय फक्त आणि फक्त सर्वांगीण विकासासाठीच असेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Mahayuti will win with a majority in Sangamner Municipal Council elections

संगमनेर : संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुती बहुमताने विजयी होणार आहे. हा विजय फक्त आणि फक्त सर्वांगीण विकासासाठीच असेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील असे सशक्त नेतृत्व असताना विकासाची गती तीन पटीने वाढली आहे आणि त्याचा थेट लाभ संगमनेरला मिळणार आहे.

खताळ म्हणाले, की संगमनेरकरांना चांगले ठाऊक आहे की विकास कधी आणि कोणामुळे होतो. मागील चाळीस वर्षे एकाच गटाच्या ताब्यात सत्ता होती, पण एवढ्या कालावधीतही शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य कोणत्याही क्षेत्रात मोठे काम झाले नाही. म्हणूनच एक वर्षापूर्वी संगमनेरकरांनी परिवर्तनाचा धाडसी निर्णय घेतला. प्रत्येकाला संधी दिली आता आम्हालाही पाच वर्षे नगरपरिषदेची जबाबदारी द्या. जर आमच्या कारभारात विकास झाला नाही, तर पुढील वेळी आम्हालाच जाब विचारा. पण विश्वास ठेवा, संगमनेरचे चित्र बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

शहरासाठी ज्या योजना जाहीर केल्या, त्यात अनेक महत्त्वाची कामे समाविष्ट आहेत. सर्वप्रथम शहरातील पाणीपुरवठा हा जनजीवनाशी निगडित विषय प्राधान्याने हाताळला जाईल. सत्तेवर आलो की सर्वात पहिल्यांदा संगमनेरकरांना शुद्ध, आणि पर्याप्त पाणी मिळेल याची हमी देतो. शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे करून वाहतुकीच्या समस्या दूर करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

यामुळे शहरातील खड्डेमुक्त, टिकाऊ आणि नियोजनबद्ध रस्ते उभारले जातील. महिला व बालकांच्या आरोग्यासाठी विशेष रुग्णालय उभारले जाणार असून, अत्याधुनिक सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता आणि वेगवान उपचार यावर भर दिला जाणार आहे. तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने स्वतंत्र एमआयडीसी क्षेत्र उभारण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

यामुळे स्थानिक उद्योगधंदे वाढतील आणि संगमनेरातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाची व तत्काळ सेवा देणारी प्रशासनशैली लागू करण्यात येणार असून, नगरपरिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण क्षेत्रात विशेष योजना राबवल्या जातील.

Breaking News: Mahayuti will win with a majority in Sangamner Municipal Council elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here