Home अहमदनगर अहमदनगर: खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या, चिठ्ठीत मनसे नेत्याचे नाव

अहमदनगर: खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या, चिठ्ठीत मनसे नेत्याचे नाव

Ahmednagar Suicide News: एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस.

Man commits suicide after getting tired of being questioned by a private bank

अहमदनगर: तालुक्यातील एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांनी चिठ्ठी सापडली. या चिठ्ठित मनसे नगरसेवक वसंत मोरेच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने सगळेच हैराण झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मोहन आत्माराम रक्ताटे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहन यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज काढून मालवाहू टेम्पो विकत घेतला होता. परंतु, कर्जाचे दोन हफ्ते थकल्याने संबंधित बँकेने त्यांचा टेम्पो जमा केला. एवढेच नव्हेतर, मोहन यांच्या परस्पर बँकेने टेम्पो विकला. कोणतीही नोटीस न देता बँकेने टेम्पो विकल्याने आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे मोहन यांनी रविवारी (१० डिसेंबर २०२३) विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

या घटनेची महिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने होती. “माझे दोन हफ्ते थकल्याने संबंधित बँकने माझा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता माझ्या परस्पर विकला, वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील”, असे चिठ्ठीत लिहिले होते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  मोहन रक्ताटे यांनी २०२२ मध्ये बँकेकडून कर्ज घेऊन मालवाहू टेम्पो खरेदी केला. यानंतर मोहन यांच्या वडिलांचे निधन झाले आणि महिन्याभरातच टेम्पोला अपघात झाला. दुरुस्तीच्या कामामुळे टेम्पो दोन महिने जागेवरच उभा होता. परिणामी, त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बँकेचा हफ्ता देता आला नाही. यानंतर बँकेने मोहन यांचा टेम्पो जमा केला. टेम्पो विकून बाकीचे हफ्ते देण्याचा मोहन यांचा विचार होता. परंतु, त्यांचा आणि बँकचा व्यवहार जुळला नाही. यानंतर त्यांनी मित्राकडून पैसे घेऊन संपूर्ण कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. मात्र, बँकेने टाळाटाळ केली, अशी माहिती सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आली. तसेच मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे हेच आपल्याला न्याय देऊ शकतात, असे चिठ्ठीत लिहिण्यात आले होते.

Web Title: Man commits suicide after getting tired of being questioned by a private bank

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here