Home श्रीरामपूर अहमदनगर: होम थियटर परत मागितल्याने एकाचा निर्घुण खून

अहमदनगर: होम थियटर परत मागितल्याने एकाचा निर्घुण खून

Breaking News | Ahmednagar: मित्राला वापरायला दिलेला होम थिएटर परत मागितल्याचा राग आल्याने मित्राने कटरचे वार करीत, डोक्यात दांडक्याने मारून गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू.

man was murdered for demanding the return of his home theater

श्रीरामपूर : मित्राला वापरायला दिलेला होम थिएटर परत मागितल्याचा राग आल्याने मित्राने कटरचे वार करीत, डोक्यात दांडक्याने मारून गंभीर जखमी केलेल्या तरुणाचा लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

रमेश गायकवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. गोंधवणी परिसरात हा सिनेस्टाईल थरार घडला. श्रीरामपूर शहरानजीक गोंधवणी, वॉर्ड नं. १ येथील रहिवासी रमेश गायकवाड याने आकाश बबन ढमके ऊर्फ डंग्या (रा. गोंधवणी) याला स्वतःचा होम थिएटर व स्पीकर वापरण्यास दिला होता. आकाश नेहमी रमेशच्या घरी येत असे. होम थिएटर पसंत पडल्याने रमेशने त्याला तो वापरण्यास दिला होता. बऱ्याच दिवसांनंतर आकाश दिसल्यानंतर रमेशने त्याला होम थिएटर व स्पीकर मागितला असता, ‘आकाशने स्पीकरबाबत मला काही विचारायचं नाही, माझ्या नादी लागायचे नाही,’ असे म्हणत धमकी देत कटरने रमेश याच्या अंगावर वार केला. डोक्यात दांड्याने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. रमेशचा चुलत भाऊ शेखर राजू गायकवाड हा मित्राचा वाढदिवस असल्याने तेथून जवळच असल्याने तो मदतीस धावला. चुलत भाऊ रमेशला जखमी अवस्थतेत श्रीरामपूर येथील साखर साखर कामगार रूग्णालय व नंतर लोणी येथे उपचारासाठी नेले, मात्र प्राथमिक उपचारानंतर लोणी येथे प्रवरा ग्रीन रुग्णालयात उपचार सुरू असताना रमेश गायकवाड याचा मृत्यू झाला.

 चुलत भाऊ शेखर गायकवाड याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश बबन ढमके ऊर्फ डंग्या याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, जखमी रमेश गायकवाड याचा मृत्यू झाल्यानंतर वाढीव खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: man was murdered for demanding the return of his home theater

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here