Home औरंगाबाद मानलेल्या भावाच्या मित्रांचा महिलेवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटना

मानलेल्या भावाच्या मित्रांचा महिलेवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटना

Breaking News | Chatrapati Sambhajinagar: मानलेल्या बहिणीला दोन हजार रुपये देण्यासाठी पाठविलेल्या मित्रानेच इतर दोन सहकाऱ्यांसह सामूहिक अत्याचार (Gang Raped) केल्याची धक्कादायक घटना.

Mana's brother's friends gang-raped the woman

छत्रपती संभाजीनगर: मानलेल्या बहिणीला दोन हजार रुपये देण्यासाठी पाठविलेल्या मित्रानेच इतर दोन सहकाऱ्यांसह सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल होताच पाच तासांत मुख्य आरोपीला अटक केली. एकनाथ केदारे असे त्याचे नाव असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडितेने ५ एप्रिलला सायंकाळी मानलेला भावाला २ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा माझा मित्र एकनाथला २ हजार रुपये घेऊन तुझ्याकडे पाठवितो, असे त्याने सांगितले. एका माणसाकडून पैसे घेऊन तुम्हाला देतो, तुम्ही माझ्यासोबत चला, असे एकनाथने पीडितेला सांगितले. पीडिता त्याच्या दुचाकीवर बसून केम्ब्रिज चौकात पोहोचली. तेथे अन्य दोघांनी पीडितेला झाडांमध्ये ओढत नेत बलात्कार केला. तसेच मंगळसूत्र व मोबाइलही नेला.

अत्याचार झाल्यानंतर पीडिता रडतच रस्त्यावर आल्याने नागरिकांनी विचारपूस केली. मात्र, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. पुढे एका दुचाकीस्वाराने त्यांना पिसादेवी चौकात आणून सोडले. तेथून पीडिता घरी पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

Web Title: Mana’s brother’s friends gang-raped the woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here