Home क्राईम Murder: दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून

Murder: दगडी कडप्पा डोक्यात घालून एकाचा खून

Manchar Murder of one by throwing a stone cloth at his head

मंचर | Murder: लाकडी काठी व दगडी कडप्पा डोक्यात घालून मंचर येथे एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. बाळू राधु पारधी वय ५० वाळूंजवाडी ता. आंबेगाव असे खून झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाळूंजवाडी ठाकरवाडी येथे बाळू राजू पारधी हे मुले सून,नाती यांच्याबरोबर एकत्र राहतात. बाळू पारधी हे आसपास परिसरात मोलमजुरी करत असे. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते.

गुरुवारी सायंकाळी बाळू पारधी कामावर चाललो असे सांगत घरातून बाहेर निघून गेले. ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही. मुलगी रीना हिच्याकडे गेले असतील असे समजून कुटुंबीयांनी शोध घेतला नाही.

गुरुवारी सायंकाळी मंचर शहराच्या हद्दीत घोडेगाव रस्त्यालगत असणाऱ्या दर्ग्याजवळ सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संजय पारधी यांना बाळू पारधी हे दारू पिऊन पडलेले दिसले होते. रस्त्याने वाहनातून जाताना त्यांना पाहिले होते. सकाळी कुटुंबीयांनी शोधाशोध केली. सकाळी घोडेगाव रस्त्यालगत असणाऱ्या दर्ग्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

रात्री अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी लाकडी काठीने व दगडी कडप्पाने मारहाण करून बाळू पारधी यांचा खून केला. घटनास्थळी लाकडी काठी व दगडी कडप्पा मिळून आला. संदेश बाळू पारधी यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंचर पोलीस खून करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर करीत आहे.

Web Title: Manchar Murder of one by throwing a stone cloth at his head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here