मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार
Breaking News | Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांची मुदत देऊ केली आहे (Manoj Jarange Patil). देवेंद्र फडवणीस यांना अल्टीमेटम.
Manoj Jarange Patil: गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी आता उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणखी काही दिवसांची मुदत देऊ केली आहे असे जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे हे नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आणि गावातील आंदोलक यांच्या मदतीने उपोषण सोडणार आहेत.
आचारसंहिता लागेपर्यंत मी राजकीय भाषा बोलणार नाही. त्यानंतर कोण काय बोलले हे मी सांगतो. मी कोणाला सोडणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. फडणवीस साहेब तुमच्या हाताने सत्ता पाडू नका, मी काहीच येऊ देणार नाही, नंतर बोंबलु नका असे जरांगे पाटील म्हणाले. एकदा मी राजकारणाकडे जायचं नाही म्हंटल तरी जाणार नाही असे ते म्हणाले. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
माझ्या लोकांना मारहाण केली, पण माझं ऐकून त्यांनी मार खाल्ला. आरक्षण दिलं नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सलाईन घेऊन ये मी उपोषण करू शकत नाही असे जरांगे पाटील म्हणाले. श्रीमंत मराठे आपली पोर कधीच मोठ होऊ देणार नाहीत. शेतकरी मराठा रात्रंदिवस चिखलात उन्हात काम करून आपलं लेकरु कधी नोकरीला लागेल याची वाट बघतो. प्रत्येक पक्षातील मराठा वाट बघतो असे जरांगे पाटील म्हणाले.
आचासंहिता लागेपर्यंत आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठ्यांनी खचून जाऊ नये, सरकारने आपल्याशी धोका केला तर तुम्ही आपल्या लेकरांना धोका देऊ नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. पक्षाच्या नेत्यांच्या पोरं मोठे करण्याच्या नादाला लागून आपल्या लेकरांचे वाटोळं करू नका असेही जरांगे म्हणाले. राजकारणाच्या नादाला लागू नका, अडाणी का होईना आपले लोक सभागृहात पाहिजे असंही ते म्हणाले. आरक्षण नाही दिले तर सत्तेत जाऊ. मला रोज मंत्र्यांचे फोन येत आहेत. अंमलबजावणी होत असेल तर या नाहीतर येऊ नका असे म्हणतो असेही जरांगे म्हणाले. मला बदनाम करतील बाकी काही करतील असेही जरांगे म्हणाले. मला 4-5 दिवस तरी आरामाची गरज, मला हॉस्पिटल ला भेटायला येऊ नका, पुन्हा अंतरवलीमध्ये भेटू असंही जरांगे म्हणाले.
Web Title: Manoj Jarange will break his hunger strike, wait the Election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study