संगमनेर: उड्डाणपुलाखाली पुरुषाचा मृतदेह आढळून , एकच खळबळ
Breaking News | Sangamner: गुंजाळवाडी शिवारातील उड्डाणपुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह, एकच खळबळ उडाली.
संगमनेर: संगमनेरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारातील उड्डाणपुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह मंगळवारी दि. १३ रात्री ८ वाजेच्या सुमारास आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सदर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून संपूर्ण अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला आहे. त्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. अॅसिड टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस कॉस्टेबल आत्माराम पवार यांनी तत्काळघटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मयताची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
साधारण मयताचे ५० वय असून गळ्यात रुद्राक्ष माळ असून लांब सफेद दाढी आहे. उजव्या हातात लाल रंगाचा धागा बांधला असून त्यात काळे-पांढरे मणी आहेत.
Web Title: Man’s Dead body was found under the flyover, a sensation
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study