जरांगे पाटील यांनी आंदोलन घेतलं मागे; उपोषण सोडून सीएम शिंदेंच्या हस्ते जीआर स्वीकारला
Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द.
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा जीआर शासनाने रात्री तयार केला होता. वाशीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीआरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवा जीआर सुपूर्द केला. यामध्ये मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यात मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांनी हा जीआर स्वीकारत आंदोलन मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर पाच महिन्यांनतर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे.
जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जीआर सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे वाशीमध्ये आले होते. यावेळी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या पूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गिरीश महाजन आणि दीपक केसरकर हे मंत्री उपस्थित होते.
सभेआधी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जीआर स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पेढा भरवला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल उधळण्यात आला. जरांगे पाटील यांना यावेळी तलवार देखील भेट देण्यात आली. जरागेंनी मुख्यमंत्री शिंदे यांचे यावेळी अभिनंदन केले.
Web Title: Maratha Reservation andolan Victory Manoj Jarange Patil withdraws the protest
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study