मराठा आरक्षण: या जिल्ह्यात २५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी, निवडणुकांवरही बहिष्कार
Maratha Reservation: राजकीय नेत्यांची मोठी कोंडी, जालना जिल्ह्यात २५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे.
जालना: मराठा आरक्षण मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता राजकीय नेत्यांना देखील बसू लागली आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून जालन्यातील २५० गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. (Latest Marathi News)
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात येऊ देणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. यामुळे राजकीय नेत्यांची मोठी कोंडी होत असून त्यांना मोठा मनस्तापही सहन करावा लागत आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आणि पालकमंत्री अतुल सावे, यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
इतकंच नाही, रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे यांचाही एक राजकीय कार्यक्रम मराठा आंदोलकांनी उधळून लावल्याची माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण केलं होतं. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. आता हा अल्टिमेटम संपत आला आहे. दरम्यान, ४० दिवसांची मुदत देऊन सुद्धा सरकारने आरक्षणासाठी ठोस पाऊलं उचलली नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.
जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. त्यानुसार, जालन्यातील २४५ गावांनी एकमताने ठराव घेत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कारही टाकण्यात आला आहे.
Web Title: Maratha Reservation Entry of political leaders banned in 250 villages
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App