मनोज जरांगेंच्या मागणीवर गौतमी पाटीलचे भाष्य
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवं तर दिली ही प्रतिक्रिया. (Gautami Patil).
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षण मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना अभिनेत्री कलाकार गौतमी पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यासाठी त्यांनी राज्यभर दौरेही सुरू केले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकार मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय समोर आला नाही. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. मलाही आरक्षण हवं आहे, असं वक्तव्य गौतमीने केलं. ती प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होती.
राज्यात मराठा आरक्षण मिळायला हवं आहे का? असा प्रश्न विचारला असता गौतमी म्हणाली, “होय, मला मराठा आरक्षण मिळायला हवं.” मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळायला हवं, या जरांगेंच्या मागणीबाबत विचारलं असता गौतमी पुढे म्हणाली, मला यावर काहीही बोलायचं नाही. मला यात तुम्ही ओढू नका. मलाही आरक्षण हवं आहे. त्यामुळे सर्वांना आरक्षण मिळायला हवं. तुला कुणबी प्रमाणपत्र हवं आहे का? यावरही गौतमीने होकारार्थी उत्तर दिलं आहे.
Web Title: Maratha Reservation Gautami Patil’s comment on Manoj Jarang’s demand
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App