मराठा समाजाने एकजुटीचे दर्शन घडविले, १७० एकर जागा
Breaking News | Ahmednagar: जरांगे पाटील यांच्याबरोबर तीन ते चार लाख लोक. (Maratha Reservation)
पारनेर | सुपा : १७० एकर जागा, ९० भोजन केंद्र, ३० वैद्यकीय पथके आणि दोन हजार स्वयंसेवक अशी महाव्यवस्था मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर जाणाऱ्या पदयात्रेतील लोकांसाठी सुपासह पारनेर तालुक्यातील व श्रीगोंदा तालुक्यातील मराठा समाजाने करून एकजुटीचे दर्शन घडविले.
मराठा आरक्षणासाठी लाखो लोकांना बरोबर घेऊन मुंबईकडे जाणारे मनोज जरांगे पाटील यांचे सोमवारी दुपारी बारा वाजता जेवणासाठी सुपा येथे नियोजन निश्चित होते. जरांगे पाटील यांच्याबरोबर तीन ते चार लाख लोक असतील, अंदाज धरून नियोजन करण्यात आले. त्यानुसार सुपा परिसरातील गावांमध्ये व पारनेर तालुक्यासह श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मराठा आंदोलकांनी संपर्क केला, त्यानुसार अनेक गावांनी तीस हजार, वीस हजार ते पाच हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली. मोठी गर्दी आणि जेवणाच्या जागेचे नियोजन नगर पुणे महामार्गावरच सरदार बहादूर सिंह पवार यांची व परिसरात असणाऱ्या १७० एकर जागेवर जरांगे पाटील यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जेवणाचे नियोजन केले.
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून जेवणाला सुरुवात झाली होती. रात्री नऊ वाजेपर्यंत जेवण सुरू होते. लापशी, भात, पुलाव, चटणी, बेसन भाकरीपासून अनेक पदार्थांचे ९० भोजन केंद्र होते. पाणी बाटल्यांचे ढीग जमा झाले होते. सुपा येथील नियोजनासाठी दोन हजार स्वयंसेवक काम करत होते. तालुक्यातील डॉक्टरांनी तीस वैद्यकीय पथकाद्वारे आलेल्या आंदोलकांची तपासणी केली. औषधसाठा उपलब्ध केला.
केळी तीनशे टन, तांदूळ, गुळ, बुंदीची पाकिटे मोठ्या प्रमाणावर होती. प्रत्येक गावातील युवक यासाठी उत्साहात व स्वयंस्फूर्तीने जेवण वाढणे किवा खाण्याचे पदार्थ देण्याचे काम करीत होता. श्रीगोंदा तालुक्यातील गावातून टेम्पो भरून जेवण आले होते. प्रत्येक जण जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आरक्षण लढ्याला आपला हातभार लागेल, या भावनेतून काम करत होता.
सुपा येथील सभेत जरांगे पाटील म्हणाले, राजकारणी हे ओबीसी व मराठा समाजात दुरावा निर्माण करत आहेत. गावखेड्यात ओबीसी व मराठा सोबत आहेत. एका दुचाकीवरून गेले तरी पन्नास – पन्नासचे पेट्रोल टाकतात. इतके प्रेम त्यांच्यात आहे. समाजाला मायबाप मानून कुटुंब बाजुला सारले. आपली जात राजकारणासाठी फुटू देऊ नका. एकजूट राहू द्या. मराठ्यांच्या एकजुटीचा जगाला हेवा वाटला पाहिजे. सगळ्यांनी मुंबईत या. जे पाठीमागे राहतील, त्यांनी मागची खिंड लढवा. आम्ही शांतपणे आंदोलन करतोय. मुंबईला चाललेल्या पोरांना उघडे पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
Web Title: Maratha Reservation The Maratha community showed unity
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study