…..अन्यथा मराठे तुम्हाला दरात उभे करणार नाहीत- मनोज जरांगे पाटील
Marataha Reservation: अध्यादेश अंमलबजावणी व्हावी, म्हणून १० तारखेपासून मी उपोषण सुरू करणार.
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाबाबतचत्या अध्यादेशाची अंमलबजावणी १५ फेब्रुवारीरोजी होणाऱ्या अधिवेशनात झाली पाहिजे. मंत्र्यांनी त्याला सहकार्य करावे, अन्यथा मराठे तुम्हाला दरात उभे करणार नाहीत. अध्यादेश अंमलबजावणी व्हावी, म्हणून १० तारखेपासून मी उपोषण सुरू करणार आहे, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.५) पत्रकार परिषदेत सांगितले.
५४ लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप होत आले आहे. आता ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करावेत आणि प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सोशल मीडियावर आरोप करणाऱ्यांनी आंदोलन आणि उपोषण करून दाखवावे. आमच्या आंदोलनामुळे अनेकांचे दुकान बंद झाले आहे. स्वतःला अभ्यासक म्हणून, घेऊ नका. जर अध्यादेशात चूक असेल, तर चूक काय दुरुस्ती करायची ते सांगाः सर्व अभ्यासकांनी कायदा मजबूत कसा होईल, यासाठी सचिवांकडे जाऊन त्यांचे मत मांडावे. आरक्षण मिळेपर्यंत आपली एकजूट कायम ठेवावी. सर्व आमदार आणि मंत्र्यांनी कायद्याच्या बाजूने बोलावे, अशी विनंतीही जरांगे यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन ५ महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू केले आहे. या आंदोलनामुळे ७० वर्षांत समाजाला मिळाले नाही, ते या लढ्यातून समाजाला मिळाले आहे. आम्ही कधीही खोट केलेली नाही आणि करणारही नाही मुंबईला जाण्याआधी आमच्यावर ट्रॅप रचले. पण ते यशस्वी झाले नाहीत. मला कशाचीही अपेक्षा नाही, श्रेयही नको. मात्र, पावेळी समाजाचा विरोध असतानाही मला १० तारखेला उपोषणाला बसावेच लागेल, अध्यादेशाची कायद्यात प्रक्रिया सुरू होण्यासाठी आमरण उपोषण मी ताकदीने करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. “महाराष्ट्रातील काही १०-२० जणं सरकारी व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असं ते सोशल मीडियावर विचारत असतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाहीये. हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मला बाजूला करण्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटत नाही. श्रेयासाठी हे विनाकारण मध्ये घुसायला लागले आहेत. मराठा समाजाचेही काही जळणारे नेते आहेत, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
Web Title: Maratha Reservation Marathas will not put you in the price – Manoj Jarange Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study