Home जालना राज ठाकरेंची जरांगे पाटील यांना भावनिक साद, “गड्यांनो महाराजांची आण…..  

राज ठाकरेंची जरांगे पाटील यांना भावनिक साद, “गड्यांनो महाराजांची आण…..  

Maratha Reservation:  गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी… मोहीम फत्ते होईस्तर झुजत राहू या… पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये!

Maratha Reservation Raj Thackeray's emotional support to Jarange Patil

जालना: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या या उपोषणाने संपूर्ण महाराष्ट्रभर जोर धरला आहे. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना मोहीम फत्ते होईपर्यंत झुंजत राहू, असे आवाहन करत जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे.

मनसेच्या अधिकृत x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज एक पोस्ट केली या पोस्टमधून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढू असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या खचून न जाता आणि राजकारणापढे एकही योद्धा खर्ची पडला नाही पाहीजे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

मनसेकडून एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, गड्यानो महाराजांची आण हाय तुम्हाशी  मोहीम फत्ते होईस्तर झुंजत राहू या. पर ह्या निबऱ्या पुढार्यान पुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये अशा मजकुराची पोस्ट मनसेने एक्स या सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे. यामध्ये ते आंदोलनकत्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत.

Web Title: Maratha Reservation Raj Thackeray’s emotional support to Jarange Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here