Home अकोले अकोले तालुक्यातील सर्व गावांत मंगळवारी कडकडीत बंद…कडकडीत बंद..कडकडीत बंद 

अकोले तालुक्यातील सर्व गावांत मंगळवारी कडकडीत बंद…कडकडीत बंद..कडकडीत बंद 

Maratha Reservation: सकल मराठा समाज आरक्षणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन अधिक तीव्र.
Maratha reservation Strict closure in all villages of Akole taluka on Tuesday
अकोले: मराठा आरक्षण आंदोलनास बसलेले मनोज जरांगे पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खूपच खालावलीय. शरीरात ताकत राहिलेली नाही. ते आज स्टेजवरच कोसळल्यावर त्यांना तिथे असलेल्या दोघांनी सावरलं. उपोषणाचा गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला आहे. यावेळेस  ग्रामस्थ त्यांना पाणी पिण्याचे आवाहन करत होते. ‘पाणी घ्या, पाणी घ्या, जरांगे पाटील पाणी घ्या’ अशी घोषणा गावकऱ्यांकडून सुरु होती. तुम्हाला समाजांच ऐकावच लागेल. आज तुम्हांला पाणी प्यावंच लागेल असा आग्रह ग्रामस्थ करीत असताना यावेळी जरांगे-पाटील म्हणाले, मी मराठा समाजाला माय-बाप मानतो. तुमची माया मला कळतेय पण मी पाणी प्यायलो तर लेकरांना न्याय कसा मिळेल. ते या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळेच हे जनआंदोलनाची तीव्रता अधिक वाढवून पाठिबा देण्यासाठी व सरकारच्या वेळकाढू धोरणांचा धिक्कार व निषेध करण्यासाठी मंगळवार दिनांक ३१ आक्टोंबर रोजी संपूर्ण अकोले तालुक्यातील सर्व गावांतून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मंगळवारी अकोले शहरासह संपूर्ण तालुका कडकडीत बंद..बंद..बंद 
याबाबत सर्व व्यावसायिक, दुकानदार व शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी अकोले तालुका बंद मधे सहभागी होऊन सकल मराठा समाज आरक्षणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात भागीदार व्हा..अकोले तालुका उद्या मंगळवार दिनांक ३१ आक्टोंबर कडकडीत बंद..कडकडीत बंद…
Web Title: Maratha reservation Strict closure in all villages of Akole taluka on Tuesday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here