अहमदनगर: सहा महिन्यापू्वीच झालं होत लग्न…अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू
Ahmedngar News | Jamkhed: सामोरा समोर झालेल्या अपघातात (Accident) तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना.
जामखेड : सामोरा समोर झालेल्या अपघातात तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात जामखेड येथील व्यापारी अतिष भागवत पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. संथ गतीने सुरू असलेल्या व एकेरी वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याची नागरिकांत चर्चा आहे. परीणामी आतातरी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व ठेकेदार यांना जाग येणार का असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आतिष भागवत पवार हे बुधवारी रात्री ९ वा. जामखेड वरून बीड रोडने मोटारसायकलवर चालले होते. दरम्यान बीड रोडने एक चारचाकी वाहन वेगाने जामखेडकडे येत होते.
याच दरम्यान एका हॉटेल जवळ या वाहनाची व मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकल वरील आतिष भागवत पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर रात्री ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण जामखेड परिसरात शोककळा पसरली.
जामखेड बाजार समितीमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले होते. आतिष पवार यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील तसेच चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.
रम्यान जामखेड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून संबंधित चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. सध्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने सध्या बीडरोडने एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
परीणामी अरुंद रस्ता असल्याने हा अपघात घडला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. मात्र आतातरी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना जाग येणार का व या कामाला वेग येणार का हे पहावे लागणार आहे.
Web Title: marriage took place six months ago…the businessman died in an accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App