धक्कादायक! ब्लॅकमेल करत चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार
Breaking News | Jagaon Crime: धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलतबहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार.
जळगाव: बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलत बहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार (abused) केले. हा धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलतभावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी २७ वर्षीय महिला नातेवाइकाकडे असलेल्या लग्नाच्या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी ती कपडे बदलत असताना तिच्या चुलतभावाने तिचे फोटो काढण्यासह व्हिडिओ देखील तयार केला. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या घरी चुलतभावाने अत्याचार केला.
त्यानंतर पुन्हा तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून अत्याचार करणे सुरूच ठेवले. त्याने अन्य दोन मित्रांना देखील सोबत आणले व तिघांनी वेळोवेळी महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवारी (२३ जून) चुलत भाऊ तसेच त्याचे दोन मित्र अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउनि दत्तात्रय पोटे करीत आहेत.
Web Title: married sister was abused by two friends along with a cousin by blackmailing
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study