Home नाशिक विवाहितेची  तीन मुलींसह विहीरीत उडी घेत आत्महत्या

विवाहितेची  तीन मुलींसह विहीरीत उडी घेत आत्महत्या

Breaking News | Nashik Suicide Case: विवाहितेने आपल्या तीन मुलींसह विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना.

married woman committed suicide by jumping into a well with her three daughters

नाशिक: बागालाण तालुक्यातील मोठे साकोडे येथील विवाहितेने आपल्या तीन मुलींसह विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सरला तुकाराम देशमुख (30) असे विवाहितेचे नाव आहे. तर संध्या तुकाराम देशमुख(7), मनश्री तुकाराम देशमुख(6), वेदश्री तुकाराम देशमुख(1वर्ष 6 महिने) असे या तीन मुलींचे नावे आहे.साकोडे शिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सरला ने आपल्या तिघा मुलींसह आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोठे साकोडे येथील रहिवासी असलेले तुकाराम विठ्ठल देशमुख हे शेती व्यवसायनिमित्त मोठे साकोडे फाट्यावरील मळ्यात राहतात काल दिनांक 4 रोजी सरला व मुली घरातून अचानक कुठे गेल्या याचा शोध त्यांनीे घेण्याचा प्रयत्न केला सरला यांचे माहेर असलेल्या मळगाव (पिसोरे) येथे रात्री तिचा पती तुकाराम याने तपास केला असता तिथे ही सरला व मुली मिळून आल्या नाही आज सकाळी परत शोधत असतांना, साकोडे शिवारात आरम नदी काठावरील विहिरीत एका मुलीच्या मृतदेह तरंगताना आढळून आला.

याबाबत त्यांनी साकोडे पोलीस पाटील नंदन देशमुख यांना माहिती दिली असता शोध घेणारे तुकाराम देशमुख यांना विहिरीजवळ बोलावले असता मोठी मुलगी संध्या चा मृतदेह असल्याची खात्री झाल्याने अन्य चप्पल ही तिथे असल्याने संशय बळावल्याने इतर तिघांचा ही शोध स्थानिक नागरिकांच्या मदतीने घेण्यात आला असता तीन मुलींसह सरला चा मृतदेह मिळून आला. याबाबत सटाणा पोलिसांना पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व सटाणा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चार ही मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी साठी नेण्यात आले . याबाबत सटाणा पोलिसात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली .

Web Title: married woman committed suicide by jumping into a well with her three daughters

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here