विवाहित महिलेच अपहरण, कर्जतच्या जंगलात नेऊन डांबून ठेवले अन…
Breaking News | Pune Crime: जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार.
पुणे: बोपदेव घाटातमित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेच अपहरण करण्यात आलं. जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. महिलेला मारहाण करण्यात आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत येथील जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींमध्ये एक महिला सुद्धा आहे. पीडित महिला विवाहित असून ती कुटुंबासोबत राहते. पुरुष आरोपी 36 तर महिला आरोपी 32 वर्षांची आहे. दोघांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा होता. आपल्या कारमधून तो पीडित महिलेला जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याने महिलेला मारहाण करुन घरात दोन दिवस डांबून ठेवलं. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून अत्याचाराचा प्रयत्न केला.
Web Title: married woman was abducted, taken to Karjat forest and kept there abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study