Home जळगाव माहेरी आलेल्या विवाहितेचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच टोकाचं पाऊल, रेल्वेलाईनवर उडी

माहेरी आलेल्या विवाहितेचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच टोकाचं पाऊल, रेल्वेलाईनवर उडी

Jalgaon Suicide:  माहेरी आलेल्या विवाहितेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना.

married woman who returned home committed suicide

जळगाव: दिवाळीची धामधूम असताना, दुसरीकडे माहेरी आलेल्या विवाहितेने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी १२ वाजता जळगावातील आशाबाबा नगर जवळ रेल्वेलाईनवर घडली. योगिता सचिन भावसार (४०, रा. वर्शी, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. योगीता या गेल्या महिनाभरापासून आजारी होत्या, आजारी असल्याने त्या माहेरी आल्या होत्या.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर येथील माहेरी असलेल्या योगिता भावसार या पती व दोन मुलांसह वर्शी, जि. धुळे येथे राहत होत्या. महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्या आपल्या जळगावात हरिविठ्ठल नगर येथे माहेरी आलेल्या होत्या. रविवारी सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा केला जात होता. योगीता यांच्याकडे माहेरी दिवाळीचा आनंद होता, लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु होती. याचदरम्यान कुणालाही काही एक न कळवता, योगीता ह्या एकट्या घराबाहेर पडल्या. त्यांनी जळगाव शहरातील आशाबाबा नगर जवळील रेल्वेलाईनवर रेल्वे खंबा क्रमाक ४१७/८ या ठिकाणी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना कळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेची माहिती कळाल्यावर योगिता यांच्या कुटुंबियांना जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, याठिकाणी ओळख पटविली असता, मयत ह्या योगीता असल्याचे निष्पन्न झाले. योगीता यांनी एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: married woman who returned home committed suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here