Home Maharashtra News पुन्हा मैदानात दिसणार मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar

पुन्हा मैदानात दिसणार मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वर्षभरानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ( Road Safety World Series ) मार्च मध्ये होणार असून चाहत्यांना आणि तमाम क्रिकेट प्रेमींना ‘सचिन सचिन’ घोषणा देण्याची संधी मिळणार आहे.

प्राप्त माहितीनुसार रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मार्च किंवा फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात देखील खेळवली जाऊ शकते. हैद्राबाद, विशाखापट्टनम, लखनऊ आणि इंदोर या शहरांत हे सामने खेळवले जाणार असल्याचंही समोर येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका असल्याने लखनऊ मध्ये निवडणूकीच्या निकला नंतर मार्चमध्ये सामने होण्याची शक्यता आहे. तर इतर शहरांत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.

रोड सेफ्टी वर्ल्‍ड सीरीजच्या पहिल्या हंगामात भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्‍लंड, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, वेस्‍टइंडीज आणि बांगलादेश या संघानी सहभाग घेतला होता. देशातील दिग्गज आणि निवृत्त क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. दरम्यान सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया लेजेंड्स’हा संघ विजयी झाला होता. सचिनसोबत या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण, युसुफ पठाण, मोहम्मद कैफ, मुनाफ पटेल यांच्यासह आणखी काही माजी भारतीय दिग्गज खेळाडू देखील सहभागी झाले होते. इंडिया लेजेंड्सने अंतिम सामन्यात श्रीलंका लेजेंड्सला मात देत जेतेपद पटकावले होते.

Web Title : Master blaster Sachin Tendulkar will be seen on the field again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here