Home अहिल्यानगर अहमदनगर गोळीबार: मास्टर माईंडला अटक, डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठी गोळीबार

अहमदनगर गोळीबार: मास्टर माईंडला अटक, डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठी गोळीबार

Breaking news | Ahmednagar:  डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठी गोळीबाराचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मास्टर माईंड सिराज दौलत खान याला अटक.

Mastermind arrested, shot to extort money from doctor

अहमदनगरः डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठी गोळीबाराचा (firing) कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मास्टर माईंड सिराज दौलत खान याला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजेंद्र देविदास भाऊ बहुधने यांनी फिर्याद दिली आहे.

नगरमधील माळीवाडा परिसरातील मशिरा फिश अँड बर्ड्स हाऊसमध्ये बुधवारी सायंकाळी गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या चौकशीतून गोळीबारामागील सत्य समोर आले. आरोपी सिराज खान याने राजेंद्र देविदास बहुधने याला त्याच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये बसून डॉक्टर प्रदीपकुमार तुपेरे यांच्या तारकपूर येथील नवोदय क्लिनिक येथे नेले. त्यानंतर बहुधुनी याला घेऊन तो त्याच्या माळीवाडा येथील मशिरा फिश अँड बर्ड्स च्या दुकानात आला. तिथे त्यांनी डॉक्टरांनाही बोलावून घेतले. तिघांमध्ये चर्चा सुरू असतानाच सिराजाने राजेंद्र बहूधने यास मारहाण करण्यास सुरुवात केली.नगरमधील माळीवाडा परिसरातील मशिरा फिश अँड बर्ड्स हाऊसमध्ये बुधवारी सायंकाळी गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या चौकशीतून गोळीबारामागील सत्य समोर आले. आरोपी सिराज खान याने राजेंद्र देविदास बहुधने याला त्याच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये बसून डॉक्टर प्रदीपकुमार तुपेरे यांच्या तारकपूर येथील नवोदय क्लिनिक येथे नेले. त्यानंतर बहुधुनी याला घेऊन तो त्याच्या माळीवाडा येथील मशिरा फिश अँड बर्ड्स च्या दुकानात आला. तिथे त्यांनी डॉक्टरांनाही बोलावून घेतले. तिघांमध्ये चर्चा सुरू असतानाच सिराजाने राजेंद्र बहूधने यास मारहाण करण्यास सुरुवात केली.

Web Title: Mastermind arrested, shot to extort money from doctor

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here