मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Breaking News | Suicide Case: १३ वर्षीय मुलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
चंद्रपूर : १३ वर्षीय मुलीसोबत आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी सावली तालुक्यातील खेडी शेतशिवारात ही घटना उघडकीस आली.
दर्शना दीपक पेटकर (३५) आणि समीक्षा दीपक पेटकर (१३) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या मूल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दर्शना यांनी समीक्षासह खेडी शेतशिवारातील विहिरीत उडी घेतली. त्यांना ग्रामीण रुग्णालय, सावली येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास सावलीचे पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
Web Title: Mileki committed suicide by jumping into a well
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study