Home महाराष्ट्र धक्कादायक! हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मायलेकीचा मृतदेह

धक्कादायक! हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मायलेकीचा मृतदेह

Breaking News | Palghar Crime: नाल्यामध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत मायलेकींचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.

Mileki's body was found with his hands and feet tied

पालघर: पुण्यामध्ये माजी नगरसेवकाची भरचौकात गोळ्या झाडून अन्  कोयत्याने न वार करत  हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील गुन्हेगारी घटनांवरुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच पालघरमध्ये मायलेकींचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, , पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून नाल्यामध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत मायलेकींचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बर्डे पाड्याजवळील ही घटना आहे. सुश्मिता प्रविण डावरे (वय, २८) असे मृत महिलेचे नाव असून तिच्यासोबत दोन वर्षांची चिमुकलीही मृतावस्थेत आढळून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे माय-लेकींचे मृतदेह नाल्यातील दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबतची माहिती मिळताच मनोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबत अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

Web Title: Mileki’s body was found with his hands and feet tied

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here