Home Crime News Cyber Crime : लग्नाचं अमिष दाखवत असंख्य तरुणींकडून उकळले लाखो रुपये

Cyber Crime : लग्नाचं अमिष दाखवत असंख्य तरुणींकडून उकळले लाखो रुपये

Kalyan Crime

कल्याण : शहरातील एका 34 वर्षीय तरुणाने सोशल मीडिया आणि मॅट्रीमोनिअल साईटवर अक्षरश: आपले जाळे पसरले होते. आरोपीनं प्रत्यक्षात कधीही समोरा समोर न भेटता तब्बल 35 ते 40 तरुणींना ऑनलाईन गंडा घातला आहे. स्वतःला खूप श्रीमंत असल्याचे भासवून आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवित अनेक तरुणींची लाखो रुपयांना फसवणूक केली आहे. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर, गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत.

विशाल चव्हाण उर्फ अनुराग असं अटक केलेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपीनं सोशल मीडिया आणि मॅट्रीमोनिअल साईटच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 35 ते 40 तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. आरोपीन स्वतःला श्रीमंत असल्याचं भासवून प्रत्यक्षात कधीही न भेटता त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. या प्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणीने कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

आरोपीनं पीडित तरुणीला मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नासाठी विचारणा केली होती. त्यासाठी आपण खूप श्रीमंत असल्याचेही त्यानं पीडितेला भासवलं होते. त्यानंतर त्यानं आपल्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करायची असल्याचं भासवित पीडितेला अभ्युदय बँकेत सव्वा दोन लाख रुपये भरण्यास सांगितलं होतं. पीडित तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवून सांगितलेल्या खात्यात पैसे भरले. पण पैसे मिळाल्यानंतर आरोपी विशाल यानं पीडितेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र आरोपीनं वापरलेले मोबाईल नंबर, सोशल मीडिया अकाउंट तसेच मॅट्रोमोनियल साइटवर टाकलेला पत्ता आणि फोटो बनावट होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणं आव्हान बनलं होतं.

पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास करत आरोपीचा माग शोधून काढला. यानंतर पोलिसांनी सापळा रचून कल्याण पूर्वेकडील श्रद्धा महल या इमारतीतून त्याला अटक केलं आहे. आरोपी विशाल याने काही तरुणींना प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले असल्याचे समजते. या सोबतच त्याने स्वस्तात आयफोन देण्याच्या नावाखाली 20 ते 25 तरुणांची देखील फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात शीव, वर्सोवा, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Web Title : Millions of rupees boiled down by numerous young women showing lust for marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here