Home महाराष्ट्र सुजय विखेंच्या संगमनेरमधून उमेदवारीबाबत मंत्री विखे पाटलांच मोठं विधान……

सुजय विखेंच्या संगमनेरमधून उमेदवारीबाबत मंत्री विखे पाटलांच मोठं विधान……

Breaking News |Akola: माजी खासदार सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल, असे विधान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.

Minister Vikhe Patil big statement regarding Sujay Vikhe's

अकोला : भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल, असे विधान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

ते अकोला येथे बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोल्यात होते. कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीसाठी ते जिल्ह्यात आले होते. यावेळी समारोपाच्या भाषणात ते बोलत होते.

अद्यापही पक्षाने कुठल्याच उमेदवारी जाहीर केल्या नाही. त्यामुळं सुजय आणि मला कुठले अधिकार नाहीये. सुजय विखेंच्या उमेदवारीवरून पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार आम्ही पुढं पाहू. शेवटी सुजय हा जिल्ह्याचा खासदार राहिला आहे.  पक्षाने आदेश दिल्यास मग उभं राहायचंय, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Web Title: Minister Vikhe Patil big statement regarding Sujay Vikhe’s

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here