चुलत्यानेच पळविली अल्पवयीन मुलगी, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
Breaking News | Crime: आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना समोर.
केज : आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर केज पोलिसांनी अवघ्या ४८ तासात तपास घेवून संशयितांच्या मोबाईल लोकेशन आधारे तपास काढून संशयित व्यक्तीला पुण्यातून ताब्यात घेतले. दरम्यान अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा मुलीचा नात्याने चुलता असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि.५ मार्च रोजी मध्यंतरच्या सुट्टीत इयत्ता ८ वीच्या वर्गात शिकत असलेल्या एका चौदा वर्ष वयाच्या मुलींचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात अपहरणकर्त्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकातील पोलिस नाईक अनिल मंदे आणि पोलीस नाईक दिलीप गिते यांनी संशयित अपहरण कर्त्याची मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याचा तपास घेतला. आरोपी मुलीसह वाघोली परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्या संशयितांच्या ताब्यात मुलगी असल्याचे निष्पन्न होताच केज येथून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक अनिल मंदे आणि पोलीस नाईक दिलीप गिते यांनी संशयित अपहरण कर्त्याची मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याचा तपास घेतला. आरोपी मुलीसह वाघोली परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्या संशयितांच्या ताब्यात मुलगी असल्याचे निष्पन्न होताच केज येथून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक अनिल मंदे दिलीप गिते यांनी वाघोली, पुणे येथून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा नराधम हा मुलीचा नात्याने चुलता असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी नराधम चुलत्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक शेळके हे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Minor girl abducted by her cousin, case registered for sexual assault
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study