Home जळगाव अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक

Breaking News | Jalgaon Crime: तुझ्या झालेल्या शारीरीक संबंधाबाबत सर्वांना सांगून देईल अशी धमकी देत अत्याचार. (abused)

Minor girl abused by two, one arrested

जळगाव : धरणगाव तालुक्यात २०२३ मध्ये दिवाळीच्या नंतर एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. अत्याचार केलेल्या आरोपीचा साक्षीदार मित्राने देखील पिडीतेसोबत झालेला अत्याचार सगळ्यांना सांगून देईल असे सांगून धमकावत पिडीतेवर शेतशिवारात नेऊन अल्पवयीन मुलीवर पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेश मधील बडवाणी जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी परिवारासह धरणगाव तालुक्यातील एका शेतात वास्तव्याला आहे. आरोपी प्रवीण छत्र्या बारेला (रा. कानळदा ता. जळगाव) याने सन २०२३ मध्ये दिवाळीनंतर ४ ते ५ दिवसांनी तसेच जानेवारी २०२४ दरम्यान अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दिले. त्यानंतर धरणगाव तालुक्यातील एका शिवारात नेऊन अत्याचार केले. तसेच पीडित मुलीला व तिच्या आई वडिलांना जीवे ठार मारून देण्याची धमकी दिली.

प्रवीण बारेला हा पीडित मुलीशी शारीरिक संबंध करीत असल्याचे पाहून दुसरा आरोपी पन्नालाल मराठे (रा. पारोळा नाका ता. धरणगाव) याने देखील पीडित अल्पवयीन मुलीला एकांतात गाठून प्रवीण बारेला आणि तुझ्या झालेल्या शारीरीक संबंधाबाबत सर्वांना सांगून देईल अशी धमकी दिली. त्यानंतर पन्नालाल मराठे याने देखील अल्पवयीन मुलीला शेत शिवारात अत्याचार केला.

याबाबत पीडित मुलीने तिच्या आईला घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. मुलगी व आईच्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण बरेला आणि पन्नालाल मराठे यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्नालाल मराठे यास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनावणे करीत आहेत.

Web Title: Minor girl abused by two, one arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here