अहमदनगर: पाणी पिण्याचा बहाणा करीत घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य
Breaking News | Ahmednagar: पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना.
अहमदनगर: पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना नगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरोधात विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. शाहबाज शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कोठी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नगर शहरातील एका भागात राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. बुधवारी सकाळी सात वाजता तिचे वडिल व १० वाजता आई कामावर गेली होती. त्यावेळी ती घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी तिची मैत्रिण घरी आली होती. दरम्यान साडेबाराच्या सुमारास शेख फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीकडे मोबाईलनंबर मागितला असता तिने देण्यास नकार दिला. त्याने तगादा लावल्याने फिर्यादीने तिच्या वडिलांचा मोबाईलनंबर दिला. काही वेळाने त्याने फिर्यादीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. फिर्यादी पाणी आणण्यासाठी गेली असता त्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. फिर्यादी घाबरून वडिलांना फोन करण्यासाठी घराबाहेर आली असता त्याने तिचा हात धरून अतिप्रसंग केला. फिर्यादी त्याच्या तावडीतून सुटून घरात गेली व आतून दरवाजा बंद केला. घडलेला प्रकार वडिलांना फोन करून सांगितला. फिर्यादीचे वडिल घरी आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.
Web Title: minor girl by entering the house on the pretext of drinking water
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study