चंदनापुरी घाटात खून झालेली अल्पवयीन मुलीची ओळख पटली, सीसीटीव्हीचे फुटेज हाती
Sangamner Crime: अज्ञात इसमाने तिचे डोक्यात दगड घालून खून (Murder) केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जुन्या घाटामध्ये गणपती मंदिराच्या पाठीमागे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. आता या अल्पवयीन मुलीची ओळख पटविण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्हीचे फुटेज आल्याचे समोर आले आहे. सदर मुलगी ही संगमनेर शहरातील एका उपनगरातील आहे. यामुळे तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जुन्या चंदनापुरी घाटातील गणपती मंदिराच्या पाठीमागे मुलीचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली होती. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, सहायक पोलीस निरीक्षक इस्माईल शेख, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, अजय आठरे यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सदर मुलीचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले होते.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने तपास सुरू केला. यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. सदर या अल्पवयीन मुलीची ओळख पटली असून ती संगमनेरातील एका उपनगरात राहत होती. अज्ञात इसमाने तिचे डोक्यात दगड घालून खून केला.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 633/ 2023 भारतीय दंड संहिता कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे हे करत आहे.
Web Title: Minor girl murder in Chandnapuri ghat identified, CCTV footage in hand
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App