Home पुणे अल्पवयीन मुलीशी संबध ठेवल्याची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी, ६७ लाख उकळले

अल्पवयीन मुलीशी संबध ठेवल्याची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी, ६७ लाख उकळले

Minor girl sexual abuse: अल्पवयीन मुलीशी संबध ठेवल्याची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी, ६७ लाख उकळले, दोघांना अटक 

Minor girl sexual abuse the police for having relations with a minor girl

पुणे: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबध ठेवल्याने ती गर्भवती झाली. तिने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे करू नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना पैसे देण्याचे कारण सांगून दोघांनी या मुलीशी संगनमत करून एका तरुणांकडून तब्बल ६७ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी भावडी, वाघोली  येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ७७६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखील ऊर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (वय २७, रा. गाडीतळ, हडपसर) यांना अटक केली आहे. तसेच त्यांची साथीदार तरुणीवर गुन्हा (crime) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२० पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि एका मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांच्यात शारीरीक संबंध निर्माण झाले. तिने व तिचे मित्र चेतन हिंगमिरे व निखील म्हेत्रे यांनी संगनमत करुन फिर्यादीला लुबाडण्याचा कट रचला. या दोघांनी फिर्यादीला ही मुलगी अल्पवयीन आहे. तसेच तुझ्यामुळे तिला गर्भधारणा झाली आहे, असे सांगून ती पोलिसांकडे बलात्काराची तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादीच्या घरी हे सांगण्याची धमकी  दिली. प्रकरण मिटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतील, असे धमकी दिली. फिर्यादी यांनी घाबरुन ते सांगतील, त्याप्रमाणे वेळोवेळी पैसे देत गेले. त्यांनी आतापर्यंत ६७ लाख ७ हजार ५५३ रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. त्यानंतरही अजून पैसे मागत होते. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांनी घाबरुन गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ दोघांना अटक केली आहे.

Web Title: Minor girl sexual abuse the police for having relations with a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here