संगमनेर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार, गर्भवती झाल्याचे कळताच….
Sangamner Crime: अल्पवयीन मुलीशी फोनवरून संपर्क साधत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबध प्रस्थापित केले, आरोपीस अटक.
संगमनेर: एका अल्पवयीन मुलीच्या चुलत मामे बहिणीला पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाने त्या मुली बरोबर बोलायचे आहे असे सांगून अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर मिळवला व त्या अल्पवयीन मुलीशी फोनवरून संपर्क साधत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबध प्रस्थापित केले. सदर मुलगी गर्भवती झाल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
प्रवीण जाधव (अंबेगव्हाण, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हा दिनांक ९ जून रोजी २०२३ रोजी घडला असून ओतूर पोलीस ठाण्यात दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी दाखल करण्यात आला. सदर गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग झाल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजीच घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर पीडित मुलगी ही इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. या अल्पवयीन मुलीच्या मोबाईल नंबरचा फायदा उठवत आरोपींने वारंवार फोन करून तिच्याशी जवळील निर्माण करून त्याचा गैरफायदा घेत आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. नंतर लग्नाला नकार दिला.
पुणे जिल्ह्यातील ओतूर तालुक्यातील हा आरोपी संगमनेर तालुक्यातील एका मुलीला लग्नाच्या पाहण्यासाठी आला होता. त्यावेळेस सदर पीडित अल्पवयीन मुलगी इयत्ता नववी मध्ये पठार भागात एका शाळेत शिकण्यासाठी होती. या मुलीच्या चुलत मामे बहिणीला पाहण्यासाठी प्रवीण जाधव हा आरोपी मुलीच्या गावी गेला होता त्यावेळी पाहायला गेलेल्या मुलीशी नंतर संपर्क साधण्यासाठी या अल्पवयीन मुलीचा नंबर आरोपीने घेतला व तिच्याशी वारंवार संपर्क करून तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा शारीरिक संबंध निर्माण केले तसेच तिला वारंवार लग्नाचे आमीष दाखवले व तिच्या इच्छे विरुद्ध बळजबरी करून तिला मोटरसायकल वरून देखील दुसऱ्या गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पिडीत मुलीचे आई-वडील हे गरीब असल्याने त्यांनी भीतीपोटी कुठेही तक्रार दाखल केली नाही. आई-वडील सदर आरोपीला भेटल्यावर त्याने लग्नास नकार दिला असल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.
घारगाव पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर आरोपी प्रवीण जाधव यांच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
Web Title: the minor girl was abducted and abused
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App