अहमदनगर: भर रस्त्यात अल्पवयीन मुलीला छेडले,दोन तरुणांविरूध्द गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भर रस्त्यात तरूणाने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना. दोन अनोळखी तरुणाविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अहमदनगर: अल्पवयीन मुलीचा (वय 17) पाठलाग करून भर रस्त्यात तरूणाने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 27) रात्री नगर शहरात घडला. याप्रकरणी पीडित मुलीने मंगळवारी (दि. 28) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी तरुणाविरूध्द विनयभंग, पोक्सो कलमानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रिण नगर शहरातील एका दुकानात गेल्या होत्या. त्या रात्री नऊ वाजता घरी जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात पाणीपुरी खाण्यासाठी थांबल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण आले व ते त्यांच्याकडे एकटक पाहू लागले. फिर्यादी व त्यांची मैत्रिण पाणीपुरी खाऊन झाल्यावर इचरजबाई शाळेच्या रस्त्याने जात असताना त्या दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालविणार्या तरुणाने फिर्यादीचा हात पकडून चिठ्ठी दिली. त्यात माझा नंबर असून मला फोन कर असे तो फिर्यादीला म्हणाला. दरम्यान फिर्यादीने त्या तरुणाच्या ताब्यातून सुटका करून घेत तिचा मामा काम करत असलेल्या चितळे रस्त्यावरील मेडिकल गाठली.
फिर्यादी व तिची मैत्रिण मेडिकलमध्ये गेल्या असता ते दोन तरुण त्यांचा पाठलाग करून तेथे आले. दुचाकी स्टॅण्डवर लावून फिर्यादीला चिठ्ठी देत असताना तिच्या मामाने त्यांना आवाज दिला. ते घाबरून दुचाकी सोडून व हातातील चिठ्ठी खाली टाकून पसार झाले. त्यानंतर पीडित फिर्यादी मुलीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फरार झालेल्या दोघांचा शोध सुरु केला आहे.
Web Title: minor girl was molested on the road, a case was registered
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study