Home नाशिक नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Nashik Crime News: आजारी असल्याने घरीच आराम करीत असलेल्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापानेच बलात्कार केल्याची घटना समोर.

father himself raped daughter case registered

नाशिक: आजारी असल्याने घरीच आराम करीत असलेल्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधमाने या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला होता. तोच व्हिडिओ पीडितेच्या आईने पाहिल्यानंतर घटनेची वाच्यता झाली. आईने पीडित मुलीला विश्वासात घेतले आणि नराधम पतीविरोधात म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने म्हसरुळ पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यांची १३ वर्षांची मुलगी आठवीच्या वर्गात शिकते. २५ एप्रिल २०२४ रोजी ती आजारी असल्याने शाळेत गेली नव्हती. तर तिची आई व आजी कामावर आणि काका, आजोबा दवाखान्यात होते. भाऊ शाळेत गेलेला होता. तर, पीडित मुलगी घरातच आराम करीत होती.

त्यावेळी पीडित मुलीचा नराधम पिता मद्याच्या नशेत घरी आला असता, घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. तसेच, त्याने मोबाईलवर व्हिडीओही काढला आणि हा व्हिडीओ तुझ्या आईला दाखविल अशी धमकी देत या घटनेची वाच्यता न करण्याचा दम दिला. या घटनेनंतरही नराधम बापाने तिच्यावर अत्याचार केला आहे.

दरम्यान, नराधम पतीचा मोबाईल पीडितेच्या आईच्या हाती लागल्याने या घटनेचा उलगडा झाला. पीडितेला तिच्या आईने धीर देत विश्वासात घेतल्यानंतर तिने आपबिती आईला सांगितले. यानंतर महिलेने नराधम पतीविरोधात पोलीसात धाव घेतली. त्यानुसार म्हसरुळ पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक हाके तपास करीत आहेत.

Web Title: father himself raped daughter case registered

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here