अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार, पिडीतेने गळफास घेत संपविले जीवन
Breaking News | Chandarapur Crime: 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला ओयो लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार.
चंद्रपूर : अत्याचार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. या घटनेनंतर बल्लारपूर शहरात तणावाची स्थिती आहे. या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला आहे. 2 सप्टेंबरच्या रात्री आरोपी शिवम दुपारे या 20 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला ओयो लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर काल रात्री आरोपीवर पोलिसांनी pocso अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित पावलं उचलत आरोपीला उशीरा अटक केली.
घडलेल्या प्रकारानंतर अल्पवयीन मुलीला बदनामीची भीती वाटत होती, त्यामुळे तिने गळफास लावून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीने उचलेल्या टोकाच्या पावलानंतर बल्लारपूर शहरामध्ये तणावाची स्थिती आहे. सध्या परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं आहे. तसंच अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्यामुळे ओयो हॉटेल मालकावरही कारवाई केली जाणार आहे.
Web Title: minor girl was taken to a lodge, abused, and ended her life
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study