कंपनीच्या मालकाकडून अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार
Vasai Crime: एका कंपनीत अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस कंपनी मालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना.
वसई पूर्वेच्या एका कंपनीत अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस कंपनी मालकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना वसईतून समोर आली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर नराधम कंपनी मालक आरोपीला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने तब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई पूर्वेच्या सातिवली येथील एका प्रिंटिंग कंपनीत पीडित १६ वर्षीय मुलगी काम करते. मंगळवारी (३१ डिसेंबर) रोजी कंपनीच्या मालकाने सदर पीडित मुलीला तिच्या विरोधात तक्रार आली असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर तिला तोडगा काढू म्हणत कार्यालयात बसवून ठेवले. त्यानंतर या नराधमाने दुपारी कार्यालयातच तिच्यावर बलात्कार केला.
या प्रकाराने पीडित मुलगी घाबरून गेली. मात्र तरीही ती दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर आली. बुधवारी (१ जानेवारी) रोजी ती पुन्हा कामावर आल्याचं पाहून संध्याकाळी सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर कंपनी मालकाने पीडितेला मोठ्या सेठना तुला भेटायचं असल्याचं सांगून थांबवून घेतलं. त्यानंतर तिला कंपनीच्या गच्चीवर नेत आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर अखेर पीडित मुलीने वालीव पोलीस ठाणे गाठून कंपनी मालका विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६५ (१) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनी मालकाला तब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: minor girl was sexually abused for two days by the owner of the company
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News