Home नाशिक रेसिंग बाईकवर फिरायला नेलेल्या अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये बलात्कार

रेसिंग बाईकवर फिरायला नेलेल्या अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये बलात्कार

Breaking News | Nashik Rape Case: मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून रेसिंग बाईकवर बसवून फिरायला नेत तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.

minor girl who was taken for a ride on a racing bike was raped in a lodge

नाशिक: तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून रेसिंग बाईकवर बसवून फिरायला नेत तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून तिने ११ व्या महिन्यांत स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिला आहे. पोलिसांनी तरुणास अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्यान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक भाऊसाहेब जोगदंड(रा. रामदास स्वामी नगर, टाकळी रोड, उपनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व संशयित तरुण ऋतिक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडिता ही पंचवटीतील निमाणी स्टँन्डजवळील परिसरात वास्तव्यास असून, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेते. ऋतिकने मुलशी ओळख वाढवली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्याने त्याने जानेवारी २०२४ मध्ये तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने होकार दिला. ती प्रेमात पडल्याची संधी साधत त्याने तिला विविध ठिकाणी रेसिंग बाईकवरून फिरायला नेले. दरम्यान, त्याने अल्पवयीन मुलीला टाकळी रोडवरील शहनाई लॉन्सजवळील एका लॉजमध्ये नेले. या ठिकाणी त्याने जीवापाड प्रेम असल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली.

अल्पवयीन मुलीने ७ नोव्हेंबर रोजी स्री जातीच्या अर्भकास जन्म दिला. हे प्रकरण रुग्णालयामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानुसार संशयित ऋतिक जोगदंड याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: minor girl who was taken for a ride on a racing bike was raped in a lodge

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here