Home Maharashtra News चित्रपटसृष्टीवर शोककळा: बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेत्याचे निधन  

चित्रपटसृष्टीवर शोककळा: बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेत्याचे निधन  

Mithilesh Chaturvedi Passes Away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Mithilesh Chaturvedi Passes Away

मुंबई: मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार,, मिथिलेश यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आपल्या मूळ गावी नेण्यात आले होते. याबाबत त्यांचे जावई आशीष यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.

मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिथिलेश यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. गदर एक प्रेम कथा, सत्या आणि अशोका, बंटी और बबली, रेडी या चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या  होत्या.

Web Title: Mithilesh Chaturvedi Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here