Home सांगली ब्रेकिंग न्यूज! शिंदे गटाच्या या आमदाराचे आज पहाटे निधन

ब्रेकिंग न्यूज! शिंदे गटाच्या या आमदाराचे आज पहाटे निधन

Breaking News: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज बुधवारी (31 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन.

babar

सांगली: शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज बुधवारी (31 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून आमदार अनिल बाबर यांची ओळख होती.

तबेत खालावल्यामुळे त्यांना काल उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या बाजुने गेलेले आमदार अनिल बाबर हे ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणाच्या यादीत पहिल्या क्रमांकवर होते. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते.

त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1950 रोजी झाला. त्यांनी 1972 साली वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वातआधी ते 1990 साली आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

Web Title:  MLA Anil Babar passed away Identified as Chief Minister Shindes confidant

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here